dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पोलिसांची नायलॉन मांजा विक्रीविरूध्द धडक कारवाई, 32 हजारांचा मांजा जप्त

खामगाव : शहरात विविध भागात छापे मारून स्थानिक शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी शासनाने बंदी घातलेला तसेच पशु, प्राण्यांसह मानवी जिवितास हानीकारक असलेला 32 हजार 400 रूपयांचा नायलॉन मांजा जप्त करत चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव : शहरात विविध भागात छापे मारून स्थानिक शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी शासनाने बंदी घातलेला तसेच पशु, प्राण्यांसह मानवी जिवितास हानीकारक असलेला 32 हजार 400 रूपयांचा नायलॉन मांजा जप्त करत चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

मकर संक्रांतीनिमित्त पंतग उडविण्याचा छंद अनेकांककडून जोपासला जात आहे. मात्र या छंदापायी पशु, पक्षांसह मानवी जिवीतहानी सारख्या विपरीत घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. याला कारणीभूत आहे ते म्हणजे नायलॉन मांजा. मतंग उडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लहान मुलांसापासून ते मोठ्या तरूणांकडून चक्क नायलॉन मांजाचा वापर होतांना दिसून येत आहे. या नायलॉन मांजामुळे अनेकांच्या जिवीताला धोका निर्माण झाल्याने शासनाने या मांजावर बंदी घातली आहे. मात्र तरीही छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात या नायलॉन मांजाची विक्री होतांना दिसून येत आहे. याकडे लक्ष वेधून स्थानिक पोलीस विभागाने गुप्त माहितीवरून शहरातील मोची गल्ली, चांदमारी फैल, आदी भागातील वेगवेगळ्या पाच ठिकाणी छापे मारून या कारवायांच्या माध्यमातून एकुण 32 हजार 400 रूपयांचा अवैध मांजा जप्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात खामगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार, पीएसआय इलामे, पोकॉ. राम धामोडे, अमरसिंग ठाकूर, चालक एचसी गजानन यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top