dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

टिप्पर-कारची समोरासमोर धडक; मानोरा येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू

मानोरा : व्यापारासाठी नवीन माल खरेदी करण्यासाठी अमरावतीकडे निघालेल्या मानोरा येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची   घटना शनिवारी, ४ जुलै रोजी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास कुपटा गावाजवळील घाटात घडली. या अपघातामुळे मानोरा शहरासह व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर पसार झालेल्या टिप्पर चालकाला पोलिसांची अटक

मानोरा : व्यापारासाठी नवीन माल खरेदी करण्यासाठी अमरावतीकडे निघालेल्या मानोरा येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची   घटना शनिवारी, ४ जुलै रोजी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास कुपटा गावाजवळील घाटात घडली. या अपघातामुळे मानोरा शहरासह व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

या अपघातात मानोरा  येथील विदर्भ कलेक्शनचे मालक  सुफियान कादर लंघा (वय २४) आणि विदर्भ जनरल स्टोअर्सचे मालक  शेख इम्रान शेख जरीम (वय ३१) यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सुफियान लंघा हे रेडिमेड कपड्यांचे व्यावसायिक होते, तर इम्रान शेख हे जनरल स्टोअर्स व कोल्ड्रिंक्स व्यवसायाशी संबंधित होते. आपल्या दुकानांसाठी नवीन माल खरेदी करण्याच्या उद्देशाने दोघेही एमएच-३२-एएस-५८५८ क्रमांकाच्या कारने अमरावतीकडे रवाना झाले होते. दरम्यान, कुपटा गावाजवळील घाट रस्त्यावर त्यांची कार पोहोचताच समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. कारमधील दोन्ही युवक गंभीररीत्या दबले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.  दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या टिप्पर चालक उत्तम तिरमाळे (रा. उल्लासवाडी, ता. पुसद) याला पोलिसांनी तातडीने शोध घेऊन अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 

या दुर्घटनेमुळे मानोरा शहरातील व्यापारी वर्गाला मोठा धक्का बसला असून, अल्पवयात दोन होतकरू व्यावसायिकांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top