Sanju Rathod : ‘गुलाबी साडी’ हे गाणं सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. हे गाणं ज्यांनी लिहिलं, गायल ते संजू राठोड एकेकाळी शिक्षणासाठी बुलढाण्यात होते. हे कदाचित जिल्हा वासियांना माहिती नसेल. स्वतः संजू राठोड याने हे सांगितल आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आवर्जून बुलढाण्याचा उल्लेख केला.
बुलढाणा : ‘गुलाबी साडी’ हे गाणं सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. आयपीएल असो की, अंबानीचं लगीन की, ढीगभर रियालिटी शो ! सगळीकडे हे गाणं वाजलयं.. देश विदेशातील दिग्गज मंडळी या गाण्यावर मनमुराद थिरकली. हे गाणं ज्यांनी लिहिलं, गायल ते संजू राठोड एकेकाळी शिक्षणासाठी बुलढाण्यात होते. हे कदाचित जिल्हा वासियांना माहिती नसेल. स्वतः संजू राठोड याने हे सांगितल आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आवर्जून बुलढाण्याचा उल्लेख केला.
संजू राठोड हा बंजारा समाजातून येतो. मूळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. जळगावपासून १५ किलोमीटर दूर असलेल्या तांडा वस्तीत तो लहानसा मोठा झाला. चौथीपर्यंतचे शिक्षण आपल्या गावी पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड नागो येथील आश्रम शाळेत त्याचा प्रवेश करण्यात आला होता. दहावीपर्यंतचे शिक्षण तिथेच पूर्ण केले. असे संजू राठोड यानी सांगितले.