dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जिल्ह्यातील १० परीक्षा केंद्रांवर भावी डॉक्टरांनी दिली ‘नीट’

बुलढाणा : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी  संपूर्ण देशभरात नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे रविवारी ‘नीट’ परीक्षा पार पडली. बुलढाणा जिल्ह्यातील १० परीक्षा केंद्रांवर तब्बल ४ हजाराहून अधिक परीक्षार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून परीक्षेला सामोरे गेले. 

बुलढाणा : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी  संपूर्ण देशभरात नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे रविवारी ‘नीट’ परीक्षा पार पडली. बुलढाणा जिल्ह्यातील १० परीक्षा केंद्रांवर तब्बल ४ हजाराहून अधिक परीक्षार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून परीक्षेला सामोरे गेले. 

  परीक्षा केंद्रांवर सकाळी ११ वाजेपासूनच विद्यार्थ्यांनी पालकांसमवेत हजेरी लावली होती. बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित राहिले होते. दुपारी २ ते ५ या वेळेत ही परीक्षा पार पडली. रखरखते ऊन असल्याने  विद्यार्थ्यांच्या पालकांनी केंद्राबाहेरच  मिळेल त्या सावलीखाली  पूर्णवेळ ठिय्या मांडला.परीक्षेत येताना कोणत्याही प्रकारच्या दागिने घालण्यावर मनाई होती. याशिवाय कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस बाळगू नये म्हणून मेटल डिटेक्टरने कसून तपासणी करण्यात आली व त्यानंतरच आतमध्ये सोडण्यात आले.

‘या’ केंद्रांवर झाली परीक्षा 

जिल्ह्यातील एकूण दहा परीक्षा केंद्रांपैकी बुलढाणा शहरात ६ परीक्षा केंद्र होते. यामध्ये, बहुतेक सीबीएससी शाळांचा समावेश करण्यात आला होता. शहरातील भारत विद्यालय, एडेड हायस्कूल, बुलढाणा केंब्रिज स्कूल, सहकार विद्या मंदिर येथे परीक्षा पार पडली. या व्यतिरिक्त चिखली, शेगाव येथील प्रत्येकी एक  व खामगाव शहरातील महाविद्यालयातील दोन केंद्रांवर असे जिल्ह्यातील एकूण दहा परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा पार पडली. 

सुमारे ३६०  पर्यवेक्षक.. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीसह जिल्हा प्रशासनाच्या संयोजनातून पार पडलेल्या परीक्षेदरम्यान  सुमारे ३६० पर्यवेक्षकांनी  लक्ष्य ठेवले. 

पोलिसांचा बंदोबस्त.. 

परीक्षेदरम्यान  अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून एका परीक्षा केंद्रांवर दोन पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय केंद्रबाहेरील परिसरात सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top