25 वर्षानंतर गोदावरी नदीला महापूर; पैठण शहरात पाणी; प्रशासनाकडून 475 कुटुंबाचे स्थलांतर

पैठण :  गेल्या काही दिवसापासून जायकवाडी धरण क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपासून 1 लाख 98 हजार 72 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून 2 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे तब्बल 25 वर्षानंतर गोदावरी नदीकाठच्या पैठण शहरातील विविध वसाहतीत पूराचे पाणी शिरले आहे.

नंदकिशोर मगरे / पैठण :  गेल्या काही दिवसापासून जायकवाडी धरण क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपासून 1 लाख 98 हजार 72 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जायकवाडी धरणातून 2 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे तब्बल 25 वर्षानंतर गोदावरी नदीकाठच्या पैठण शहरातील विविध वसाहतीत पूराचे पाणी शिरले आहे.

जायकवाडी धरणातील वरील पाणलोट क्षेत्रात. गेल्या दोन दिवसा पासून जोरदार पाऊस पडल्याने तब्बल २ लक्ष ७३४३२ क्युसेकने पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने आपतकालीन दरवाजासह २७ दरवाजे ८ फुटाने उंचावून २ लाख २६ हजार ६३८ क्युसेक वेगाने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. यंदा जायकवाडी जलाशय पुर्ण क्षमतेने भरला असून चालू वर्षी १४८ वेळा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत .त्यातच गेल्या दोन दिवसा पासून वरील पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने जायकवाडी जलाशयात २ लक्ष ७३ हजार ४३२ क्युसेकने आवक सुरू झाली आहे. जायकवाडी जलाशय पुर्ण क्षमतेने भरले असल्याने धरण प्रशासनाने रविवारी २७ दरवाजे ८ फुटाने उंचावून २ लक्ष २६ हजार ६३८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.

गोदावरी नदीने रौद्ररुप धारण केल्याने पूरस्थिती निर्माण होवून पैठण शहरातील नाथ मंदीर‚ संतनगर‚ शिवाजी महाराज पुतळा परिसर‚ गागाभट्ट चौक, कहारवाडा, पाच पिंपळ परिसर आदी परिसरात पूराचे पाणी घुसल्याने अनेक नागरिकांच्या संसार उपयोगी साहीत्य पाण्यात वाहून गेले. गोदावरी नदीला जुलै 2006 मध्ये महापूर आल्याने पैठण शहरात पाणी शिरले होते. त्यानंतर तब्बल 25 वर्षानंतर गोदावरी नदीला महापूर आल्याने पैठण शहरात पाणी शिरले आहे. पैठण पोलिस ठज्ञण्याचे निरीक्षक गोमारे, अग्निशमन दल, नगरपालिका प्रशासन आदींनी संतनगर, कहारवाडा परिसरातील 475 कुटुंबांना सुरक्षितरित्या स्थलांतरीत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »