Gangapur Crime News: गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडी येथे चोरट्यांच्या हल्ल्यात शेत मजूर ठार

घटनेचा पंचनामा करताना पोलिस

Gangapur Crime News: तालुक्यातील पिंपळवाडी येथे राहणाऱ्या शेत मजूर वृद्ध दाम्पत्यावर चोरट्यांनी हल्ला केला. यामध्ये शेत मजुराचा मृत्यू झाला तर शेत मजुराची पत्नी गंभीर जखमी झाली.

पंचनामा करताना पोलिस
पंचनामा करताना पोलिस

गंगापूर : तालुक्यातील पिंपळवाडी येथे राहणाऱ्या शेत मजूर वृद्ध दाम्पत्यावर चोरट्यांनी हल्ला केला. यामध्ये शेत मजुराचा मृत्यू झाला तर शेत मजुराची पत्नी गंभीर जखमी झाली. या घटनेत चोरानी सोने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
परसराम लालचंद पवार (७०, रा. हतनूर ता.कन्नड) हे दोन तीन वर्षपासून पिंपळवाडी येथे नवरा बायको राहत होते. मंगळवार 4 जून रोजी पहाटे एक दोनच्या सुमारास झोपेत आसतानी अज्ञात चोरांनी त्यांच्या डोक्यात फावड्याने वार करून जबर मारहाण केली. यात वृद्ध परसराम पवार हे रुग्णालयात नेताना मृत पावले. तर वृद्ध महिला लताबाई परसराम पवार (६५) यांना रुमालाने फाशी देण्याचा प्रयत्न करत असतानी त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा गावकरी मदतीला धावले. परंतु चोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. घरातून त्यांनी दोन मंगळसूत्र (सात ग्रॅम), एक कानातील टाप्से (तीन ग्रॅम) ७ हजार रुपये रोख आणि एक साधा मोबाइल असा ऐवज चोरून नेला आहे. यावेळी चोरट्यांनी घरातीलपूर्ण सामान अस्तव्यस्त केले होते.
जखमींना छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात नेले असता वृद्धाचा मृत्यू झाला. तर पत्नी महिलेचा उजवा हात मोडलेला असून कंबर आणि पायाला जबर मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. योवृद्ध दांपत्यांना चार मुले, चार मुली असून ते सर्व गावाकडे राहत होते. या गंभीर घटनेमुळे गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे

घटनास्थळावर पोलिसांचा ताफा

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले दाखल झाले होते. तर सकाळी श्वान पथक, फिंगर प्रिंट पथक देखील पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी एक संशयित आरोपी ताब्यात घेतला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »