करमाड : चिकलठाणा व करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा करमाड पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या पाच जणांसह चोरीचा ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्यासही गजाआड करीत, त्यांच्या ताब्यातून 9 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश अर्जुन पेटेकर, रा. खंडाळा, ता. पैठण, अभिषेक काकासाहेब चौधरी, शाम साईनाथ चौधरी, दोघे रा. गारखेडा नं-2, संतोष सुदाम भालेकर, रा. चिनपिंपळगाव, राजेंद्र उर्फ बवुल कडवा मते, रा. खातगाव, ता. पैठण अशी ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीतील चोरट्यांची नावे आहेत. तर स्वप्नील अतुल किनगे, रा. सिराधोन, ता. मलकापुर, जि. बुलढाणा असे चोरीचा ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातून चोरीचे तीन ट्रॅक्टर, दोन रोटावेटरसह 9 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रताप नवघरे, पोलिस अंमलदार शिवाजी मदेवाड, विजयसिंग जारवाल, विनोद खिल्लारे, सुनील गोरे आदींच्या पथकाने केली.