वैजापूर : तालुक्यातील नादी व डाग पिंपळगाव येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती एक जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली .

वैजापूर : तालुक्यातील नादी व डाग पिंपळगाव येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती एक जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली .
याप्रसंगी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच लक्ष्मण खिल्लारी ,उपसरपंच किरण राशिनकर, उप कृषी अधिकारी माधव गांगुर्डे यांनी केले .
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतीसंबंधी केलेल्या कार्याची माहिती उप कृषी अधिकारी माधव गांगुर्डे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली .
तसेच डाक पिंपळगाव येथे खरिपात पेरणी झालेल्या कापूस मका सोयाबीन या पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनाविषयी तसेच खत व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले . तालुक्यात यावर्षी मका लागवड क्षेत्रात दुप्पट वाढ झाली असल्यामुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे, त्यासाठी पिकावर इमामेक्टीन बेंजाइट 5 एसजी+निमार्क 30 मिली प्रति पंप लष्करी अळी नियंत्रणासाठी फवारणी करावी .तसेच शेतात प्रति एकरी चार ते पाच पक्षी थांबे लावावे .व जैविक औषधी मध्ये बिवेरिया बसियाना 5 टक्के डब्ल्यूपी. व मेटेरायझम एनीसोपाली 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी याविषयी उप कृषी अधिकारी माधव गांगुर्डे यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी सहाय्यक कृषी अधिकारी बळीराम ठेंगडे ,लक्ष्मण खिल्लारी, भीमराज गायकवाड ,सुरेश त्रिभुवन ,सदाशिव खिल्लारी , विष्णू पिंजारी,किरण राशिनकर ,रघुनाथ राशिनकर ,कृष्णा पवार ,वाल्मीक तुपे ,रामनाथ खेमनार ,दादासाहेब माकोडे ,मधुकर माकोडे ,सचिन पवार ,भाऊसाहेब पवार ,शिवाजी पवार ,बाळासाहेब रोकडे ,गोरख रोकडे, रवी निंभोरे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.