Explosion at Bageshwari sugar factory: परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट; दोन कामगार ठार

Explosion at Bageshwari sugar factory: परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात काम सुरू असताना स्फोट झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेत दोनजण ठार झाले. 

जालना :  परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात काम सुरू असताना स्फोट झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेत दोनजण ठार झाले. ही घटना गुरुवार, 26 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटानंतर जखमींना परतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशोक देशमुख आणि आबासाहेब पारखे असे मृत्युमुखी पडलेल्या दोन कामगारांची नावे सांगण्यात आली आहेत.  दोन कामगार गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले.घटनेची माहिती मिळताच घटनाथळी परतूर पोलिस दाखल झाले असून या प्रकरणी आणखी काही जण जखमी तर नाही. याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. चुन्याची भट्टी फुटल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.  

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »