शासकीय कर्करोग रुग्णालयात फळवाटप

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी येथील शासकीय कर्करोग रूग्णालयातील रूग्णांना फळवाटप करण्यात आले. शिवसेना मध्य ‍‍विभागप्रमुख ॲड. बाबा तायडे यांच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल उपस्थित राहून रुग्णांना फळे वाटप केली. तसेच हॉस्पिटलकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, उपचारपद्धती आणि सेवांचा आढावा घेतला. याप्रसंगी आ. जैस्वाल यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांना मनोबल टिकवून ठेवण्याचे आवाहन केले, अशा सामाजिक कार्यातून समाजात सकारात्मकता पसरते, असे मत व्यक्त करत या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ॲड. तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतूक केले. यावेळी कर्करोग हॉस्पिटलचे भडांगे तसेच डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय, कर्मचारी उपस्थित होते. या ‍कार्यक्रमाला सुभेदार सुभाष कदम, सुभेदार शेषराव आरक, राजू जाधव, संजू सिंग, दिलीप इंगळे, धम्मा सुरासे, सुशील नवगिरे, ओमकार चक्रे, दीपक दांडगे,  सुरज जाधव, विलास अवचार, देविदास साळवे, तुषार घाडगे, करीम लाला, सिद्धार्थ सरोदे, जुनेद भाई, सचिन इंगळे, दीपक गवई, जे.पी. सिंग आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »