वाशिम : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप घोषनेनुसार मदत मिळाली नसल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने वाशिम येथे १७ ऑक्टोबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील यांनी केले. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून ते निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी स्विकारले.

निवेदनात म्हटले आहे की, “मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने मदतीची घोषणा करूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. हे सरकार फक्त आकड्यांची धुळफेक करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे.” शासनाने तातडीने मदतीची रक्कम वितरित करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
नेते व कार्यकर्त्यांचा सहभाग
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील, अरविंद पाटील इंगोले, माधवराव अंभोरे, कैलासराव खानझोडे, डॉ. नारायणराव शेंडगे, वैशाली मेश्राम, रमेश पाटील गोटे, मनीष कानकिरड, काशीराम राठोड, राजेश टोपले, गजानन सरनाईक, भगवानराव शिंदे, माधवराव शेवाळे, डॉ. गजानन बाजड, गौतम कांबळे, गणपतराव भरकड, ईमरान फकीरावाले, जयंतराव ईरतकर, विजय घोडे, आसीफ पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.