dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Khamgaon accident:  दोन वेगवेगळ्या अपघातात तीन ठार!

खामगाव : शहर परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण  ठार झाल्याची धक्कादायक घटना ३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. 

खामगाव : शहर परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण  ठार झाल्याची धक्कादायक घटना ३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. 

मलकापूरहून मध्यरात्री खामगावकडे परतत असताना आमसरी फाट्याजवळ झालेल्या अपघातात शहरातील टाटा कॅपिटल कंपनीतील व्यवस्थापकाचा  मृत्यू झाला असून त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.  २ सप्टेंबर रोजी कंपनीच्या कामानिमित्त मुकेश बजरंगलाल शर्मा (२७वर्ष) रा. देशमुख प्लॉट आणि कर्मचारी सुरज दिलीपआप्पा गादगे (२५वर्ष) रा. चिंतामणी नगर हे मलकापूर येथे गेले होते. परतीच्या प्रवासात ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री चिखली तालुक्यातील आमसरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.

या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नांदुरा येथील ओम साई फाऊंडेशनची टीम घटनास्थळी धावली आणि तत्काळ जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुकेश शर्मा याला तपासून मृत घोषित केले. तर सुरज गादगे याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथमोपचार करून त्याला अकोला येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

उभ्या ट्रकला धडक ;  चालक व क्लिनर ठार

खामगाव-अकोला महामार्गावर टेंभुर्णा शिवारातील हॉटेल शिवप्रसाद समोर झालेल्या भीषण अपघातात ट्रेलर चालक आणि क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला. ३ सप्टेंबर रोजी पहाटे घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार,  पहाटे ५.५० वाजता नादुरुस्त ट्रक (क्र. एनएल-०१-एडी-६१६७) रस्त्याच्या कडेला उभा असताना, अकोल्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलर (क्र.आरजे-४२-जीए-३३३६) ने मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, ट्रेलर चालक मुस्ताक खान तयबखान (३०वर्ष) रा. खेकडा, ता. जि. अलवर, राजस्थान आणि क्लिनर शाकीरखान सुभान (३४वर्ष) रा. सेमला खुर्द, ता. गोविंदगढ, जि. अलवर, राजस्थान यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ट्रक व ट्रेलर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याबाबत ट्रक चालक शमशेर अलम मोबिन मियाँ यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून मृतक ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top