dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शेतातील चोरीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी अटकेत; ९ तोळे चांदीचा मुद्देमाल अवघ्या काही तासांत जप्त

कारंजा   :  ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतात झोपलेल्या वृद्ध महिलेच्या हातातील चांदीच्या पाटल्या चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

कारंजा   :  ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतात झोपलेल्या वृद्ध महिलेच्या हातातील चांदीच्या पाटल्या चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

ग्राम गायवळ येथील नागोराव भोपत व्यवहारे (वय ३०) यांनी १६ फेब्रुवारी  रोजी रिपोर्ट दिला होता की, त्यांच्या आई दुर्गाबाई व्यवहारे (वय ६०) या १५ फेब्रुवारी रोजी शेतात मुक्कामी थांबल्या होत्या. रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास त्या झोपल्या असताना त्यांनी हातातील अंदाजे ९ तोळे वजनाच्या चांदीच्या पाटल्या पलंगावर काढून ठेवल्या होत्या. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्या पाटल्या दिसून आल्या नाहीत. अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.  पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांच्या आदेशानुसार तपास पथकाने कारवाई सुरू केली.  मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण बबन गोडमले (वय २२) व देविदास रामदास व्यवहारे (वय ४०, दोघे रा. गायवळ ता. कारंजा) यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांच्याकडून चोरी केलेल्या चांदीच्या ९ तोळे वजनाच्या पाटल्या (किंमत सुमारे २३ हजार ४०० रुपये) जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार दीपक ढोबळे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top