dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

परतूरला भूमिहीन शेतमजूरांचे एल्गार आंदोलन

परतूर : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन लाल बावटा यांच्यावतीने बुधवार, 17 डिसेंबर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर परतूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर एल्गार आंदोलन करण्यात आले.

शेतातील वाढते यांत्रिकीकरण यामुळे हाताला कुठेही काम उरलेले नाही. गहू काढणे व ऊस तोडणी या दोन्ही ठिकाणी यांत्रिकीकरण आलेले आहे. त्यामुळे मजूराच्या हातचे काम संपलेले आहे, म्हणून भूमिहीन मजूरांसाठी स्वतंत्र योजना व कायदा सरकारने करायला पाहिजे, तसेच सरकारी जमीन नावावर करुन, देवस्थानच्या जमिनी भूमिहीन कुटुंबांना कसण्यासाठी सरकारने द्याव्यात व भूमिहीन कुटुंबांना न्याय द्यावा. भूमीहीन कुटुंबांना उत्पादनाचे कुठलेही साधन नाही. दोन हात हेच त्याच्या उत्पन्नाचे साधन आहे. सामाजिक व आर्थिक दृष्ट्या अतिशय मागासलेलं जीवन या कुटुंबाच्या वाट्याला आलेले आहे. त्यामध्ये बदल करण्यासाठी सरकारने सकारात्मक योग्य ती पावले उचलावी, याकरिता हे आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या काळात महाराष्ट्रत राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, याची दखल सरकारने घ्यावी, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‍दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top