शेगाव : शेगाव मधील प्रलंबित असलेल्या प्रभाग क्रमांक चार मधील अ आणि ब च्या पोटनिवडणुकीत आठ उमेदवारांचे भाग्य पुन्हा प्रभागातील 3600 मतदारांच्या हाती असून येत्या 20 डिसेंबर रोजी या उमेदवारांसाठी पुन्हा मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दोन जागेसाठी तब्बल आठ उमेदवार रिंगणात उभे असून संपूर्ण शहराचे लक्ष आता या प्रभागाच्या निवडणुकीकडे लागले आहे.

शेगाव : शेगाव मधील प्रलंबित असलेल्या प्रभाग क्रमांक चार मधील अ आणि ब च्या पोटनिवडणुकीत आठ उमेदवारांचे भाग्य पुन्हा प्रभागातील 3600 मतदारांच्या हाती असून येत्या 20 डिसेंबर रोजी या उमेदवारांसाठी पुन्हा मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दोन जागेसाठी तब्बल आठ उमेदवार रिंगणात उभे असून संपूर्ण शहराचे लक्ष आता या प्रभागाच्या निवडणुकीकडे लागले आहे.
शेगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन डिसेंबर रोजी एकूण 15 प्रभागापैकी 14 प्रभागातील उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र प्रभाग क्रमांक चार अ आणि ब मधील उमेदवारांचा अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये बाद झाल्याने तसेच या उमेदवारांना बाजू मांडण्यासाठी वेळ न मिळाल्याने बाद झालेले उमेदवार न्यायालयांमध्ये अपीलित गेले होते त्यामुळे या प्रभागातील निवडणूक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाने रद्द करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा नव्याने या प्रभागांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडत असून शेगाव मधील या एका प्रभागातील दोन जागांसाठी भाजपा, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस आणि एक अपक्ष असे एकूण आठ उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे. या आठ उमेदवारांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून या प्रभागामध्ये निवडणूक प्रचाराला गती मिळाल्याचे दिसून येत आहे. या प्रभागातील दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षातील नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून दोन्ही जागेसाठी मात्र भाजप राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे तीन मोठ्या पक्षांमध्येच थेट लढत असल्याचे दिसून येत असले तरी उर्वरित अजित पवार गट, बसपा व अपक्ष या उमेदवारांकडून होणाऱ्या मत विभाजनाचा कोणाला फटका बसतो. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच जळगाव जामोद नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा अ आणि ब तसेच प्रभाग क्रमांक सात मधील ब साठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. नामनिर्देशन अर्जाच्या छाननी मध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार या प्रभागातून बाद झाल्याने निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता उपरोक्त तीनही जागांसाठी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षाचे उमेदवार रिंगणात असून या तीनही जागांसाठी चूरस वाढल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे.
