शिक्षण, संस्कार हेच खरे जीवनाचे अलंकार : गणेश शिंदे

जाफ्राबाद :  जीवन सुंदर करण्यासाठी शिक्षण आणि संस्कार हेच खरे अलंकार आहेत. या दोन्ही गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करुन नये असे आवाहन कवी तथा विचारवंत गणेश शिंदे यांनी केले. जाफ्राबाद तालुक्यातील वरुड खुर्द येथे जीवन सुंदर आहे या विषयावर गणेश शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

आमदार संतोष पाटील दानवे, प्रभु गाढे यांच्या पुढाकारातून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश शिंदे यांनी ग्रामीण भागातील वास्तव जीवन, तेथील संघर्ष, आनंद तसेच जीवनातील चांगल्या, वाईट अनुभवांवर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य संतोष पाटील लोखंडे, माजी जिल्हा परिषद सभापती राजेश पाटील चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती साहेबराव कानडजे, दगडुबा गोरे, पंचायत समिती कर्मचारी संघटनेचे गणेश लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जाधव, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष बाबुराव लहाने आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाबळे यांनी केले, तर प्रभू गाढे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »