Mahamuni transferred : अप्पर पोलीस अधीक्षकाचा कारभार सांभाळणारे बि. बी. महामुनी यांची शासनाच्या आदेशान्वये २७ जून रोजी रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे.
बुलढाणा : गेल्या पावणे तीन वर्षांपासून जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षकाचा कारभार सांभाळणारे बि. बी. महामुनी यांची शासनाच्या आदेशान्वये २७ जून रोजी रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा याबाबतचा आदेश धडकला. त्यानुसार, एकुण २० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गत महिनाभरापासून सुरू असलेल्या बदल्यांच्या सत्रामुळे जिल्हा पोलीस यंत्रणेत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.