dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

घाटनांद्रा घाटातील रस्त्याची आमदार सजंना जाधव यांनी केली पहाणी : रस्ता दुरुस्तीचे सा.बां. विभागाला निर्देश

वरठाण :  मराठवाडा आणि खान्देशला जोडणारा प्रमुख मार्ग अशी ओळख असलेल्या पाचोरा ते घाटनांद्रा घाट रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा या मथळ्याखाली दैनिक ‘महाभूमि’ने बातमी गुरुवार, 18 डिसेंबर रोजी प्रकाशित करताच आमदार संजना जाधव यांनी शुक्रवार, 19 डिसेंबर रोजी घाटनांद्रा घाटातील रस्त्याची पाहणी केली. तसेच या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी दिले.

पाचोरा ते घाटनांद्रा घाट या रस्त्याची अतिवृष्टीमुळे दूरवस्था झाली असून जागोजागी रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे गेल्या चार महिन्यापासून या मार्गावरील एसटी बससेवा बंद पडली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. घाटनांद्रा घाट रस्त्याची दूरवस्था झाल्याने तसेच गेल्या चार महिन्यापासून एसटी महामंडळाची पाचोरा आगार, सिल्लोड आगार आणि सोयगाव आगाराची बससेवा बंद असल्याने प्रवाशांना छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी चाळीसगाव मार्गे किंवा अजिंठा मार्गे जास्तीचे भाडे देवून प्रवास करावा लागत आहे. दैनिक महाभूमिने गुरुवारच्या अंकात पाचोरा ते घाटनांद्रा घाट रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. तसेच प्रवाशांच्या समस्येकडेही या बातमीतून प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top