परभणी : मेळघाट परिसरातील आदिवासींच्या शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामविकासाच्या संदर्भात ज्यांनी संपूर्ण जीवनभर समर्पित कार्य करून परिवर्तन घडविणाऱ्या पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना कै. सौ. कमलताई जामकर ‘दर्पण’ पुरस्कार सोमवार, ९ मार्च रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंत जामकर, पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे, आ. डॉ.राहुल पाटील, आ. राजू नवघरे, आ. राजेश विटेकर, माजी जिप उपाध्यक्ष अँड. बाळासाहेब जामकर, मनपा गटनेते विजय जामकर, संचालक मंगेश सुभेदार, माजी सभापती भावना नखाते, निवड समितीचे सचिव अनिल मोरे, प्रा.किशन चोपडे, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, जिप सदस्य संग्राम जामकर, अजिंक्य जामकर, प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे, डॉ. जयंत बोबडे, डॉ. रवींद्र इंगळे आदींची उपस्थिती होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरुण पडघन यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संग्राम जामकर यांनी मानले.