dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सभापती उत्तम चव्हाण यांचा सत्कार

सावळदबारा :  सोयगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी उत्तम चव्हाण यांची मंगळवार, 10 मार्च रोजी निवड करण्यात आली. नवनियुक्त पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षाचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. सोयगाव पंचायत समिती सभापतीच्या निवडणुकीत सभापतीपदी उत्तम चव्हाण यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती सभापतीपदी उत्तम चव्हाण यांची निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष केला. दरम्यान, सोयगाव पंचायत समितीचे नवनियुक्त सभापती उत्तम चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षाचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top