dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दुचाकी सिमेंट मिक्सर गाडीला धडकली; लग्नाहून घरी परतणाऱ्या बापलेकाचा मृत्यू

अकोला देव : दुचाकी आणि  सिमेंट मिक्सर गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात पित्यासह नऊ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू तर मोठा मुलगाही गंभी जखमी झाला. दुचाकीवर लग्नाहून आपल्या दोन मुलांसह घरी परततांना हा अपघात घडला. ही दुर्दैवी घटना खामखेडा पाटीजवळ मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

 विनोद उत्तम चव्हाण (३४) व  युवराज विनोद चव्हाण (९) रा. कुंभारझरी, ता.जाफराबाद, जि.जालना असे या अपघातात ठार झालेल्या बापलेकांची नावे आहे. तर  शौर्य विनोद चव्हाण  चव्हाण (११) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जालना येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की,  कुंभारझरी येथील विनोद चव्हाण हे नातेवाईकाच्या लग्नासाठी आपल्या दोन मुलांसह मंगळवार, १० मार्च रोजी येथून जवळ असलेल्या गौरीशंकर मंगल कार्यालयात गेले होते. लग्नानंतर सायंकाळी ते दुचाकी वरून आपल्या दोन मुलांसह खामखेडा मार्गे परत कुंभारझरीकडे जात असताना खामखेडा पाटील जवळ त्यांच्या दुचाकीची सिमेंट मिक्सर गाडीशी जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोघा बाप लेकांचा जागीच मृत्यू झाला तर मोठा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या तिघांनाही तातडीने जाफराबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. गंभीर जखमी शौर्य चव्हाण यास पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलविले. या घटनेमुळे कुंभारझरीसह परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top