dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

नगिना पिंपळगाव येथील प्राथमिक उप-आरोग्य केंद्राचे लोकार्पण 

वैजापूर :  तालुक्यातील नगिना पिंपळगाव  येथील नविन आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण ह भ प भरत गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन आरोग्य उपकेंद्राच्या  लोकार्पण समारंभाकडे जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाचे कोणीही फिरकले नाही.

नगिना पिंपळगाव येथील नवनि आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला तरी हे उपकेंद्र सुरु झाले नव्हते. गावातील सिध्दार्थ त्रिभुवन यांनी हे उपकेंद्र मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर नगिना पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने या उपकेंद्राचे लोकार्पण ह.भ.प. भरत गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच कल्पना बाबासाहेब तागड, उपसरपंच बाबासाहेब वाळूंज, ग्रामपंचायत सदस्य शिरीष  त्रिभुवन, सूनिल देवरे, ॲड सूनिल गोरसे, उत्तम साळूंके, माजी सरपंच बाळू गायकवाड, संतोष गायकवाड, दत्तू गायकवाड, गोरख आहेर, रावसाहेब सावंत, गणेश गोरसे, शरद सावंत, अमोल गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top