एडेड हरित सेनेला पर्यावरण उपक्रमशील शाळा पुरस्कार

बुलढाणा :   पर्यावरण संवर्धनासह इतर नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या शहरातील एडेड शाळेच्या हरित सेनेला स्वातंत्र्यदिनी पर्यावरण उपक्रमशील शाळा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

बुलढाणा :   पर्यावरण संवर्धनासह इतर नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या शहरातील एडेड शाळेच्या हरित सेनेला स्वातंत्र्यदिनी पर्यावरण उपक्रमशील शाळा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

एडेड शाळेची हरित सेना वृक्षारोपण, नैसर्गिक राखीप्रर्दशनी, वन्यजीव सप्ताहनिमित्त चित्रप्रदर्शनी, निबंध, वकृत्व स्पर्धा, नैसर्गिक रांगोळी प्रदर्शनी, प्रजासत्ताक दिनी चित्ररथ, जागतिक ओझोन दिन, हे विविध पर्यावरणीय अभिनव उपक्रम राबवून विद्यार्थांमध्ये सातत्याने जनजागृती करत आहे. या कार्याची दखल म्हणून सामाजिक वनीकरण विभाग बुलढाण्याच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक धनंजय किंबहुने, हरित सेना मार्गदर्शक वनश्री पुरस्कार प्राप्त आर.एन.जाधव, हरित सेना प्रकल्प अधिकारी आर.एच.तोमर यांना वृक्ष व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या अगोदरही एडेड हरित सेनेला सामाजिक वनीकरण विभाग पुणे यांच्या पुरस्कार मिळाला आहे, हे विशेष…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »