Diwali with Sandeep Shelke's family and tribal brothers: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी सलग चवथ्या वर्षी आदिवासी बांधवांसोबत सहकुटुंब दिवाळी साजरी केली. जळगाव जामोद तालुक्यातील कुंवरदेव येथील माता-भगिनींना साडी- फराळाचे वाटप करण्यात आले.
बुलढाणा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी सलग चवथ्या वर्षी आदिवासी बांधवांसोबत सहकुटुंब दिवाळी साजरी केली. जळगाव जामोद तालुक्यातील कुंवरदेव येथील माता-भगिनींना साडी- फराळाचे वाटप करण्यात आले. “आमचा भाऊ भेटीला आला…मनोमनी आनंद झाला” म्हणत माता-भगिनींनी संदीप शेळके यांचे औक्षण केले.
जिल्ह्याच्या सीमेवरील जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल कुंवरदेव हे गाव राजर्षी शाहु मल्टिस्टेटने दत्तक घेतले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक दशके विकासापासून वंचित कुंवरदेव गावातील आदिवासी बंधू भगिनी चौफेर प्रगतीपासून दूरच राहिले. मात्र व्यवसायाला सामाजिक बांधिलकीची जोड देणारे संदीप शेळके आणि शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्ष मालतीताई शेळके यांनी कुंवरदेव गाव दत्तक घेतले. त्यामुळे गावात प्रगतीचे वारे शिरले.
दरवर्षी शेळके दाम्पत्य कुंवरदेव गावातच दिवाळी साजरी करतात. यावर्षी सुद्धा ते आपल्या सहकाऱ्यांसह गावात दाखल झाले. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आदिवासी माता भगिनींना साडी, चोळी, मिष्टान्न, कपड्यांचे वाटप केले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद बघून मनाला खूप समाधान वाटले. “आमचा भाऊ भेटीला आला…मनोमनी आनंद झाला” म्हणत माता-भगिनींनी औक्षण केले. दिवाळी हा आनंदाचा सण. इतरांना आनंद वाटून दिवाळी साजरी केल्यास खऱ्या अर्थाने मनाला समाधान मिळते, असे शिवसेना (उबाठा) चे जिल्हा समन्वयक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके म्हणाले. राजर्षी शाहू परिवाराने आदिवासीबहुल कुंवरदेव गाव दत्तक घेतले आहे. याठिकाणी आपणास विकासाची गंगा पोहचवयाची आहे. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केल्याने आनंद द्विगुणित झाला, असे राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके म्हणाल्या.
या कौटुंबिक कार्यक्रमाला सरपंच जुलामसिंह, अंगणवाडी सेविका जिजलबाई चव्हाण, छाया शेळके, मनोज वाघ, रमेश ताडे, भीमराव पाटील, वसंता इंगळे, शैलेश काकडे, संजय लोखंडे, शरद मोहिते, रवी काकडे, गणेशसिंग राजपूत, पृथ्वी राजपूत, दिलीप चव्हाण, प्रीती सावळे, सतीश बहुरुपी, नूतन वाघ आदी उपस्थित होते.