जालना : लायन्स क्लब ऑफ जालनातर्फे महिलांसाठी आयोजित ‘गोल्डन फीमेल व्हॉईस ऑफ जालना – 2025 ही गीत गायन स्पर्धा जेईएस महाविद्यालयाच्या सभागृहात 8 जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत दिव्यांग पुनम मापारी हिने आपल्या सशक्त सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून ‘गोल्डन फीमेल व्हॉईस ऑफ जालना’ हा बहुमान मिळवला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे, उद्योगपती विनय कोठारी यांची उपस्थिती होती. लायन्स क्लबच्या अध्यक्षा जयश्री लढ्ढा, सचिव मंजू श्रीमाली, कोषाध्यक्ष कल्पना बियाणी उपस्थित होत्या. याप्रसंगी संतोष सांबरे व विनय कोठारी यांनी आपल्या सुमधुर आवाजात गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेत 15 वर्षांवरील 24 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. हिंदी व मराठीमधील जुनीनवीन सुरेल गाणी सादर करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध गायक सुनील शर्मा, गजेंद्र पळसकर आणि अश्विनी कायंदे यांनी केले.
या स्पर्धेत पुनम मापारी हिने प्रथम, प्रीती काटोले यांनी द्वितीय, अमृता चाकोते यांनी तृतीय तर पूजा वेताळ आणि रोशनी पारवे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली.
यावेळी कमलबाबू झुनझुनवाला, प्रकाश कुंडलकर, राजेश लुनिया, मीरा खरात, वृंदा कुंडलकर, जयप्रकाश श्रीमाली, अतुल लढ्ढा, बद्रीनारायण बियाणी, कृष्णा लढ्ढा , प्राची बंग, गजानन मापारी, विजय शिंदे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन गजानन मापारी यांनी केले. प्रकाश कुंडलकर यांनी आभार मानले.