dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

डिजिटल जनगणना मोहिमेला वाशिममध्ये प्रारंभ : १४ जूनपर्यंत घरभेटींद्वारे माहिती संकलन; २,२१८ प्रगणकांची नियुक्ती

वाशिम  : देशातील महत्त्वपूर्ण अशा ‘जनगणना-२०२७’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ‘घर यादी व घरगणना’ प्रक्रियेला शनिवारपासून  जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाची संपूर्ण जनगणना प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेले प्रगणक    १६ मे ते १४ जून  या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. शासनाने निश्चित केलेल्या ३३ प्रश्नांनुसार माहिती गोळा केली जाणार असून ती ‘एचएलओ ऍप’ या अधिकृत मोबाईल ॲपवर डिजिटल स्वरूपात नोंदविण्यात येणार आहे. घर यादी व घरगणना प्रक्रियेदरम्यान इमारत व घर क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग, प्रवर्ग, राहण्याच्या खोल्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या, घरातील सुविधा, मालमत्ता व उपलब्ध साहित्य यासंदर्भातील माहिती विचारली जाणार आहे. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ज्या नागरिकांनी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ‘स्वयं-गणना’ पूर्ण केली आहे, त्यांनी घरभेटीसाठी येणाऱ्या प्रगणकांना आपला ‘एसई आयडी’ उपलब्ध करून द्यावा. प्रगणक हा आयडी तपासून माहिती प्रणालीमध्ये सबमिट करणार असल्याने नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

दरम्यान, ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने व्यापक पूर्वतयारी केली आहे. जिल्ह्यात एकूण २,१७४ हाउस लिस्टिंग ब्लॉक्स तयार करण्यात आले असून या कामासाठी १ मास्टर ट्रेनर, ४२ फिल्ड ट्रेनर, २,२१८ प्रगणक आणि ३७८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top