वाशीम : शनिशिंगणपूर येथे देवदर्शनासाठी जात असताना कार व ट्रकची धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यु तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवार २६ एप्रिल रोजी समृध्दी महामार्गावरील मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावाजवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथून शनि शिंगणापूरला दर्शनासाठी जात असताना वेगात असलेल्या अनियंत्रित फोर्चुनर कारने चालत्या ट्रकला मागून जबर धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त कारमधील तीघेही नागपूर येथील असल्याची माहिती आहे. जखमींना कारंजा येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.