dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

परभणीत उपमुख्यमंत्री पवारांच्या वाहनावर फेकल्या चुन्याच्या डब्या

परभणी :  एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला असे वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेस व किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी, 26 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाहनावर चुन्याच्या डब्या फेकून त्यांचा निषेध केला.

परभणी :  एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला असे वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेस व किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी, 26 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाहनावर चुन्याच्या डब्या फेकून त्यांचा निषेध केला. तसेच यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या सर्व कार्यकर्त्यांना नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले.

परभणी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी परभणीच्या दौऱ्यावर आले होते.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाहनांचा ताफा जात असताना जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव, किसान सभेचे पदाधिकारी शिवाजी कदम, प्रसाद गोरे आदींसह काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला असे वक्तव्य केले होते. त्याचा जोरदार निषेध या कार्यकर्त्यांनी केला. हे सर्व कार्यकर्ते पवारांच्या ताफ्याच्या दिशेने झेपावत असताना पोलिसांनी त्यांना अडवले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हा प्रकार घडल्याने पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली. काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत अजित पवारांच्या वाहनावर चुन्याच्या डब्या फेकून त्यांचा निषेध केला. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा देऊन त्यापासून पळ काढणाऱ्या अजित पवारांचा धिक्कार असो, सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top