जळगाव जामोद : संत तुकाराम महाराज जयंती निमित्त येथे संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना रविवार, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

जळगाव जामोद : संत तुकाराम महाराज जयंती निमित्त येथे संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना रविवार, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. हा सोहळा संत तुकाराम टॉवर, बस स्टँडजवळ संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कौलकार असतील. उद्घाटन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय कुटे, सहायक निबंधक महेश कृपलानी, अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष व दैनिक महाभूमीचे मुख्य संपादक सुरेश देवकर, दयाराम वानखडे, गजानन वाघ, अंजलीताई टापरे उपस्थित राहणार आहेत.
तुकाराम महाराज मूर्ती प्रतिष्ठापना
या निमित्ताने संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना देखील करण्यात येणार आहे. हा विधी संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज ह. भ. प. संजय महाराज मोरे देहूकर, वेदांताचार्य पुरुषोत्तम महाराज बावस्कार आणि ह. भ. प. निलेश महाराज भूमरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या पवित्र सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.