निकालाची उत्सुकता शिगेला; मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांची गर्दी

वाशिम : वाशिम नगरपरिषद निवडणूक २०२५च्या निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून आज सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

वाशिम : वाशिम नगरपरिषद निवडणूक २०२५च्या निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून आज सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील कोरोनेशन हॉल  येथे मतमोजणी सुरू असून, सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी करण्यात येत आहे. पोस्टल बॅलेटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएमद्वारे टाकलेल्या मतांची मोजणी केली जाणार असून, ईव्हीएम मतमोजणी साधारणतः सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास सुरू होण्याची शक्यता आहे.

वाशिम नगरपरिषदेसाठी एकूण ६३.५० टक्के मतदान झाले होते. नगराध्यक्ष पदासह सदस्य पदासाठी मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, याचा निर्णय काही वेळातच स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी केंद्र परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षचे उमेदवार अनिल केंदळे आणि उद्धव सेनेच्या उमेदवार रेखा सुरेश मापारी यांच्यात अटीतटीची लढत होत असल्याने वातावरण अधिकच चुरशीचे झाले आहे. निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पुढील काही तासांत चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »