व्यापाऱ्याला लुटण्याचा कट उधळला, पाच आरोपी अटकेत

बुलढाणा :  तालुक्यातील बिरसिंगपूर येथील बालाजी इंडस्ट्रीजचे मालक नारायण सिनकर हे  दिवसभराचे काम आटोपून माल विक्रीची रक्कम घेऊन बुलढाणाकडे निघाले होते. अजिंठा रोडवर त्यांना अडवून त्यांच्याजवळील रक्कम लुटण्याचा कट पोलीसांनी उधळला.

बुलढाणा :  तालुक्यातील बिरसिंगपूर येथील बालाजी इंडस्ट्रीजचे मालक नारायण सिनकर हे  दिवसभराचे काम आटोपून माल विक्रीची रक्कम घेऊन बुलढाणाकडे निघाले होते. अजिंठा रोडवर त्यांना अडवून त्यांच्याजवळील रक्कम लुटण्याचा कट पोलीसांनी उधळला. या प्रकरणी पाच आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पिस्टल,चाकूसह 2 लाख 13 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई 2 मार्चच्या रात्री करण्यात आली.

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास माहिती मिळाली की, बालाजी इंडस्ट्रीज बिरसिंगपूर शिवारचे मालक नारायण सिनकर हे दिवसभराचे काम आटोपून रात्रीचे सुमारास  माल विक्रीची रक्कम घेवून बुलढाणा स्थित घरी येतात. या बाबतची माहिती घेवून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ईसमांनी त्यांच्यावर पाळत ठेवून, त्यांना रस्त्यात अडवून, रक्कम लुटण्याचा कट रचून, तशी तयारी केली आहे. या  माहितीवरुन स्था.गु.शा. पथकाने कार्यवाही केली असता, बुलढाणा शहर ते अजिंठा रोडवर कृषी विज्ञान केंद्राजवळ बुलढाणा जवळ  आरोपी स्वप्निल विष्णू गवळी वय 30 रा. भोकरदन , आकाश रमेश गवळी वय 23 वर्षे रा. वालसावंगी, पवन जगन सपकाळ वय 25 वर्षे रा. सुंदरवाडी ता. भोकरदन , दत्ता सुनिल राऊत वय 25 वर्षे, रा. मुकुंदवाडी ता. जि. छत्रपती संभाजीनगर व लखन शालीग्राम सुर्यवंशी वय 24 वर्षे रा. जनुना ता.जि. बुलढाणा हे हे त्यांचे साथीदारांसह व्यापारी नारायण सिनकर यांना अडवून, त्यांचे कडील नगदी रक्कम लुटण्याच्या उद्देशाने, दखलपात्रगंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असतांना मिळून आले. आरोपीविरूध्द बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »