Buldhana vote counting: विधानसभा मतदार संघाची मतमोजणीच्या पाचव्या फेरीमध्ये महायुतीचे संजय गायकवाड २ हजार ६१८ मतांनी आघाडीवर आहेत.
बुलढाणा : विधानसभा मतदार संघाची मतमोजणीच्या पाचव्या फेरीमध्ये महायुतीचे संजय गायकवाड २ हजार ६१८ मतांनी आघाडीवर आहेत.
टपाली मतदानापासूनच शिंदे सेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांनी आघाडी घेतली असून, त्यांचे प्रतिस्पर्धी आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके पिछाडीवर आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा निर्णायक स्वरूपाची ठरत असून, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी दुरंगी लढत इथे होत आहे. मतमोजणी सुरुवातीपासून महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.