BJP’s public dialogue campaign : भारतीय जनता पक्षाची ध्येय-धोरणे आणि केंद्र व राज्य सरकारची सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लोकांना देण्यासाठी भाजपच्या वतीने जनसंवाद अभियान सुरु करण्यात आले आहे.

सावळदबारा : भारतीय जनता पक्षाची ध्येय-धोरणे आणि केंद्र व राज्य सरकारची सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लोकांना देण्यासाठी भाजपच्या वतीने जनसंवाद अभियान सुरु करण्यात आले आहे. जनसंवाद अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी सोमवार, 13 एप्रिल रोजी सावळदबारा सर्कलमधील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला.
भाजपच्या जनसंवाद अभियानास सावळदबारा, डाभा, घाणेगाव, मोलखेडा, रवळा. देव्हारी, महालब्धा, पिंपळवाडी आदी गावातील नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी सावळदबारा आणि फर्दापूर सर्कलमधील विविध समस्या शासन दरबारी मांडून त्या मार्गी लावण्यासाठी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी हे मंत्रालयात पाठपुरावा करीत असल्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी उपस्थितांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, ग्रामीण भागाला जोडणारी बससेवा सुरु करण्याची मागणी केली. यावेळी गुलाबराव पाटील कोलते यांनी ग्रामस्थांच्या मागण्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.


