Chhatrapati Sambhajinagar Crime News: घरफोडी करणारा आरोपी वाळूज पोलिसांनी केला जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar Crime News

Chhatrapati Sambhajinagar Crime News: मागील एप्रिल महिन्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास वाळुज पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवार 19 मे रोजी करण्यात आली.

घरफोडी करणारा आरोपी वाळूज पोलिसांनी केला जेरबंद
घरफोडी करणारा आरोपी वाळूज पोलिसांनी केला जेरबंद

शेंदूरवादा (जि. छत्रपती संभाजीनगर) : मागील एप्रिल महिन्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास वाळुज पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवार 19 मे रोजी करण्यात आली.
शेंदूरवादा परिसरातील मुर्शिदाबाद येथील कृष्णा ब्रदीनाथ मोरे यांच्या घरी अज्ञात चोरट्याने मध्यरात्री चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना 28 एप्रिल रोजी घडली होती. कृष्णा बद्रीनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून दुसऱ्या दिवशी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून वाळूज पोलिसांचे तपास पथक गुन्हयाचा छडा लावण्यासाठी कसोशिने प्रयत्न करत होते. गुप्तबातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीनुसार पोलिसांनी उत्तम उर्फ बंडु सिताराम मोरे (रा.भगतवाडी ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर) याताब्यात घेवून गुन्हयाच्या अनुषंगाने कसून चौकशी केली. त्यांने गुन्हा कबुल केल्यानंतर त्यास रविवार 19 मे रोजी अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपीकडून गुन्ह्यात चोरी केलेला 10 ग्रॅम वजानाचे सोन्याचे नेकलेस जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास वाळूज पोलीस करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक राजेद्र सहाणे, पोलीस निरीक्षक जंयत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे, कारभारी देवरे, पोलीस नाईक सतीश हंबडे, पोलीस अंमलदार सुखदेव कोल्हे, विजय पिंपळे, सुधारक पाटील, श्रीकांत सपकाळ, नितीन धुळे, तुषार सोनवणे यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »