dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

खुनाच्या घटनेने हादरले बुलढाणा ; धारदार शस्त्राने युवकाची हत्या; आरोपी फरार : Buldhana shaken by murder incident

Buldhana shaken by murder incident : खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा बुलढाणा हादरले आहे. शहरातील एका ३८ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा बाजारलाईन परिसरात घडली. आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

बुलढाणा : खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा बुलढाणा हादरले आहे. शहरातील एका ३८ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा बाजारलाईन परिसरात घडली. आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांकडून प्राप्त महितीनुसार भीमजयंती उत्सव मिरवणूक शांततेत आटोपली. नागरिक आपापल्या घराकडे परतत होते. प्रभाग क्र. दोन मधील पप्पू उर्फ सागर भाऊराव जाधव हा युवक बाजारलाईनमधील एका दुकानजवळ उभा होता. दबा धरुन बसलेल्या आरोपीने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात पप्पू गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top