नवउद्योगांना मंजुरी देण्यात बुलढाणा जिल्हा राज्यात चौथा तर अमरावती विभागात पहिला!

बुलढाणा :  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथं स्थान पटकावलं आहे. मागच्या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील आकडेवारीनुसार, बुलढाणा जिल्ह्याने १२१.९८ टक्के नवउद्योजकांच्या प्रस्तावांना मंजुरी देत उद्दिष्टपूर्ती साधली आहे. यासोबतच अमरावती विभागातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यांनी उद्दिष्टापेक्षा अर्थात १०० टक्क्यांहून अधिक प्रस्तावांना मंजुरी देणारा अमरावती विभाग बनला आहे.

बुलढाणा :  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथं स्थान पटकावलं आहे. मागच्या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील आकडेवारीनुसार, बुलढाणा जिल्ह्याने १२१.९८ टक्के नवउद्योजकांच्या प्रस्तावांना मंजुरी देत उद्दिष्टपूर्ती साधली आहे. यासोबतच अमरावती विभागातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यांनी उद्दिष्टापेक्षा अर्थात १०० टक्क्यांहून अधिक प्रस्तावांना मंजुरी देणारा अमरावती विभाग बनला आहे.

 अमरावती विभागांतर्गत बुलढाणा जिल्ह्यासाठी ६७८, अमरावती ८४५, अकोला ८४८, वाशिम ५१८ आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ६०२ उद्योग प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. सन २०२४-२५ या एका वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (सीएमईजीपी) अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात ३,७८६ नवउद्योजकांच्या प्रस्तानवांना मंजुरी देण्यात आली आहे. यात बुलढाणा जिल्हा ८२७ उद्योगांना मंजुरी देण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेद्वारे उत्पादन क्षेत्रातील उद्योजकाला ५० लाख रुपये, तर सेवा क्षेत्रातील उद्योजकाला २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गातील उद्योजकाला कर्ज रकमेच्या १५ ते २५ टक्के, तर विशेष प्रवर्ग, एससी, एसटी, अपंग, माजी सैनिक, ओबीसी व अल्पसंख्यांकांना २५ ते ३५ टक्के अनुदान दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्यानंतर संबंधित प्रकरण बँकेकडे जाते. बँकेने कर्ज प्रकरणाला मंजुरी दिल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात अनुदान जमा होते. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ८००  लाभार्थी करण्याचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हा उद्योग केंद्राने ८३० जणांना लाभ देत १०४ टक्के इतके उद्दिष्ट गाठले आहे. यात गारमेंटमध्ये सर्वाधिक १३६, अन्न प्रक्रिया १४८, ब्युटीमध्ये ७०, फॅशन डिझायनिंगमध्ये १६, ट्रान्सपोर्टमध्ये ३० इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनीअरींग १०० व इतर ३३० असे उद्योग उभारले आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (सीएमईजीपी) २०२४-२५ या आर्थिक वर्षात ८३० लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव बॅंकांनी मंजूर केले असून यातील ३३० उद्योजकांनी ७४२ लाख रुपये शासनाकडील अनुदान घेवून उद्योग उभारले आहेत. जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांनी जिल्ह्यात उद्योग व्यवसाय करु इच्छिणाऱ्या नवउद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत अनुदान दिले जाते. मागच्या आर्थिक वर्षात बुलढाणा जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक ८२७ प्रस्तावांना मान्यता देत जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाचा बाब आहे. या कार्यक्रमांतर्गत उद्योग सुरु करण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या जिल्ह्यातील इच्छुक तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्याचे, आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी केले आहे.

जिल्हा       – उद्दिष्ट.    – मंजूर.      – टक्केवारी

 बुलढाणा    -678.     -827.    – 121.98

अमरावती     -845.   -910.    -107.69

अकोला      -848.    -899.      -106.01

वाशिम.       -518.    -539.      -104.05

यवतमाळ.   -602.    -611.      -101.50

सर्वाधिक लाभार्थी बुलढाणा तालुक्यातील

तालुका          –      लाभार्थी

बुलढाणा       –     241

खामगाव.      –      89

मेहकर.         –       65

संग्रामपूर.      –       33

मोताळा        –       50

सिंदखेड राजा  –     40

लोणार.          –    29

चिखली         –     85

शेगाव.          –    64

जळगाव जामोद. –  37

देऊळगाव राजा  –  20

मलकापूर.       –    39

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »