dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जिंकलो रे… मराठा आंदोलकांचा जोरदार जल्लोष: फटाक्यांच्या आतषबाजीसह उधळला गुलाल

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले असून राज्यसरकारने त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्याचे जाहीर होताच, मराठा आंदोलकांनी मंगळवार, 2 सप्टेंबर रोजी जिंकलो रे… आपून असे म्हणत एकच जल्लोष केला. यावेळी मराठा समाजबांधवांनी फटाक्याची आतषबाजी करीत गुलालची उधळण केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरु केले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार त्यांनी होता. मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी मंगळवारी, दुपारी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री शिवेद्रराजे भोसले, मंत्री उदय सामंत आदींच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. तसेच मराठा समाज आरक्षणासाठी जीआरचा मसूदा त्यांना दाखवला. 

आरक्षण उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मंजूर केल्याचे त्यांनी जाहीर केल्यावर मराठा आंदोलकांनी शहरात एकच जल्लोष केला. शहरातील क्रांतीचौक, औरंगपूरा, टीव्ही सेंटर, उस्मानपूरा, गारखेडा परिसरातील खासदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा, लाख मराठा, मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो, जिंकलो रे आपण असे म्हणत फटाक्याची आतषबाजी, गुलाल उधळत जल्लोष केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top