सिंदखेडराजा : तालुक्याच्या दक्षिण भागात वादळी वाऱ्यासह सायंकाळी आलेल्या पावसामुळे आंबेवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर शेंर्दुजन येथील शाळेचे संपूर्ण छतच उडून पडल्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

वादळी वाऱ्यामुळे शेंदूरजन येथील नेताजी व चौधरी शाळेचे पत्राचे व भिंतीत अँगल असलेले संपूर्ण छत समूळ उडून एका बाजूला जाऊन पडले आहे. त्यावेळी तेथे पाऊस चुकवत भिंतीच्या आसऱ्याला गेलेला युवराज किशोर शिंगणे, वय १८ व शोभाबाई खुशालराव शिंगणे वय ५८ हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तालुक्यात गुरूवारच्या सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वा. च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काढणी न झालेल्या रब्बी पिकांसह फळबागा व शेड नेटचे मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका मलकापूर पांग्रा परिसरात जास्त बसला आहे. तेथील शेटनेट उडून जाऊन पडल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही घटना घडत असतांना समोरच्या मंगल कार्यालयात जागदरी येथील कायंदे कुटुंबियांचा कुंकवाचा कार्यक्रम सुरु होता. तेथे उपस्थित रामेश्वर कायंदे, गोपाल शिंगणे, मुरली शिंगणे आदींच्या लक्षात ही घटना आल्याने दोघांनाही तेथून बाहेर काढून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.