Buldhana constituency vote counting: पहिल्या ते १२ व्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांनी आघाडी घेतली होती, आता मात्र तेराव्या फेरीपासून आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी आघाडी घेतली आहे. १४ व्या फेरी अखेरीस जयश्री शेळके ३३७ मतांनी आघाडीवर आहेत.
बुलढाणा : पहिल्या ते १२ व्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांनी आघाडी घेतली होती, आता मात्र तेराव्या फेरीपासून आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी आघाडी घेतली आहे. १४ व्या फेरी अखेरीस जयश्री शेळके ३३७ मतांनी आघाडीवर आहेत.
होय, काटे की टक्कर म्हणतात ते यालाच.. अशी चर्चा सध्या बुलढाण्यात सुरू आहे. सुरुवातीपासून आघाडी घेतलेले युतीचे उमेदवार संजय गायकवाड यांचा लीड कापत १३ व्या फेरीत जयश्री शेळके यांनी १ हजार १२४ मतांनी आघाडी घेतली आहे. १४ व्या फेरीची आकडेवारी समोर आली असून, शेळके समर्थकांचा उत्साह वाढवणारी आहे जयश्री शेळके ३३७ मतांनी आघाडीवर आहेत.