dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

BREAKING बुलढाण्यात आ. गायकवाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक!  

बुलढाणा :  तिकडे कोल्हापुरात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात तीव्र आंदोलने सुरू असताना बुलढाण्यात आ. गायकवाड समर्थकांनी त्यांच्या प्रतिमेला आज, शनिवारी दुपारी दुग्धाभिषेक करत भूमिकेला समर्थन दिले आहे. 

अनुजा सावळे म्हणाल्या, आ. गायकवाड हे छत्रपती शिवरायांचे विचार समोर ठेवून काम करणारे मावळे… 

बुलढाणा :  तिकडे कोल्हापुरात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात तीव्र आंदोलने सुरू असताना बुलढाण्यात आ. गायकवाड समर्थकांनी त्यांच्या प्रतिमेला आज, शनिवारी दुपारी दुग्धाभिषेक करत भूमिकेला समर्थन दिले आहे. 

 आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक आणि शेकडो शिवसैनिक बुलढाणा शहराचे हृदयस्थान असलेल्या  जयस्तंभ चौकात एकत्रित जमले होते. यावेळी महिला आघाडीच्या अनुजा सावळे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख ओम सिंग राजपूत यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. अनुजा सावळे म्हणाल्या, आक्षेप हा पुस्तकाच्या शीर्षकावर आहे? परंतु काही राजकीय व्यक्तींनी याला वेगळे रूप दिले. आ. गायकवाड यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. आ. संजय गायकवाड हे छत्रपती शिवरायांचे विचार समोर ठेवून काम करणारे मावळे असून, त्यांनी मतदारसंघाचा कायापालट केला. विरोधकांनी आता राजकीय वळण न देता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असाही सल्ला त्यांनी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top