खामगाव : प्रेयसीचा खून करून प्रियकराने तिच्याच साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवार 2 मे रोजी दुपारी 2 वाजता वाळूज (संभाजीनगर) मधील साजापूर येथे घडली.

खामगाव : प्रेयसीचा खून करून प्रियकराने तिच्याच साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवार 2 मे रोजी दुपारी 2 वाजता वाळूज (संभाजीनगर) मधील साजापूर येथे घडली.
शिवानंद रमेश जाधव रा. अजिंठा ता. सिल्लोड ह.मु. साजापूर असे प्रेयसीची हत्या करून स्वत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर वैष्णवी महादेव खराटे (24) रा. आवार जि. बुलडाणा असे तरुणीचे नाव आहे. प्रियकर शिवानंद याचे तीन दिवसापूर्वीच दूसरे लग्न झाल्याच्या कारणावरून त्या दोघांत चांगलाच वाद झाला, वैष्णवी खराटे ही साजापूर येथील एसबीआय बँकेच्या पाठीमागे झरीना मुसाद शेख याच्या घरात भाड्याने राहत होती. वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत ती काम करीत होती. चार ते पाच महिन्यापूर्वी शिवानंद जाधव हा तेथे तिच्यासोबत राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी 2 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्यामुळे घरमालकाची मुलगी सांगण्यासाठी गेली असता वैष्णवी खराटे हिच्या घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे घरमालकाने जोरजोराने आवाज दिल्यामुळे तेथे नागरिकही जमा झाले. घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी शिवानंद जाधव हा साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तर वैष्णवी खराटे ही जमिनीवर पडलेली होती. दुसऱ्या लग्नावरून त्यांच्यात वाद झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वैष्णवी व शिवानंद या दोघांचे प्रेमसंबंध होते व त्यांनी लग्नसुद्धा केले होते. चार ते पाच महिन्यापूर्वी शिवानंद हा तिच्यासोबत राहण्यासाठी आल्याने तिने पूर्वीची रूम बदलली, मात्र त्यानंतर शिवानंदने तीन दिवसापूर्वी दुसरे लग्न केले. ही बाब वैष्णवीला समजताच त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. तो वाद विकोपाला गेल्याने शिवानंदने तिचा गळा आवळून खून केला आणि स्वतासुध्दा गळफास घेवून आत्महत्या केली. सदर प्रकरणाचा तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करीत आहेत.