dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा साठवण तलावात बुडून मृत्यू ; सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथील घटना

वरठाण :  उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे गेलेल्या भाच्या सह मामाच्या मुलाचा बैल धुण्यासाठी गेले असता साठवण तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शनिवार, 3 मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे घडली. अकिल शकील पठाण (१८ वर्ष) रा.नांदगांव तांडा ता सोयगाव, रेहान भिकन शेख (१५ वर्ष)रा. सातगाव डोंगरी ता पाचोरा, जि. जळगाव असे साठवण तलावात बुडून मृत्यू झालेल्यां बालकांची नावे आहेत. तर साकिब कलंदर पठाण (१३ वर्ष) रा घाटनांद्रा ता सिल्लोड हा मात्र पाण्यातून बुडालेला असताना त्यास वाचविण्यात एका मुलीला यश आले.

या घटनेतील मयत रेहान भिकन शेख हा नांदगाव तांडा येथे मामा शकील पठाण याच्याकडे तर वाचलेला सकीब कलंदर पठाण हा त्याचा बहिणीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत नांदगाव तांडा येथे आला होता. शनिवारी हे तिघेही बैल धुण्यासाठी नांदगाव तांडा साठवण तलावा जवळ गेले असता, त्या तिघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही पाण्यात बुडाले. त्यावेळी साठवण तलावात कपडे धुणाऱ्या महिलांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यातील मनिषा बागुल या मुलीने साठवण तलावात उडी घेऊन या तिघांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तीला साकीब कलंबर पठाण या मुलाला वाचविण्यात यश आले. तर रेहान भिकन शेख व अकिल शकील पठाण हे दोघे पाण्यात बुडाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून पाण्यात बुडालेल्या रेहान भिकन शेख, अकिल शकील पठाण या दोघांना बेुशध्दावस्थेत पाण्याबाहेर काढुन उपचारासाठी पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मयत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. या घटनेमुळे नांदगाव तांडा गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top