जालना : दोन दिवसांपूर्वी शहारातील योगेशनगर येथून गायब झालेल्या तरुणीचा गुरूवार , 3 एप्रिल रोजी एका विहिरीत मृतदेह आढळला. सीमा भगवान पाडळे ( वय 19 वर्षे ,रा. योगेशनगर जालना ) असे मयत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा पाडळे ही तरुणी आपल्या योगेशनगर भागातील राहत्या घरातून सोमवार , 31 मार्च रोजी गायब झाली होती. याप्रकरणी तालुका जालना पोलिसांनी मिसिंगची नोंद करून तिचा शोध सुरू केला होता. दरम्यान, जालना पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीत या तरुणीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविला. या तरुणीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला..? यादृष्टीने आता पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, जालना शहरातील या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी पहाटे सुनेने सासूचा खून केल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी या तरुणीच्या मृत्यूच्या बातमीमुळे शहारातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.