Big action of police in Buldhana:विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिते दरम्यान जिल्हा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. अवैध धंदे आणि प्रतिबंधात्मक कारवाई असे मिळून एकूण एक कोटी 30 लाख 32 हजार 176 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
बुलढाणा : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिते दरम्यान जिल्हा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. अवैध धंदे आणि प्रतिबंधात्मक कारवाई असे मिळून एकूण एक कोटी 30 लाख 32 हजार 176 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी आचारसंहितेच्या काळात अनेक प्रतिबंधात्मक कारवाया पूर्ण झाल्या. यामध्ये अमलीपदार्थ हस्तगत करणे, गुन्ह्यातील वाहने जप्त करणे, देशी विदेशी अवैध मद्य विक्री, विना परवाना शस्त्र बाळगणे या प्रकरणाचा तपास करून एकूण 30 लाख 32 हजार 176 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी महामुनी, स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. यासंदर्भात जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.