dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शासकीय ग्रामीण रुग्णालयातील निकृष्ट कामाविरोधात चक्का जाम

मानोरा : शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या इमारत डागडुजी, वॉल कंपाऊंड, कर्मचारी क्वार्टर दुरुस्ती व नवीन लेबर रूमच्या कामात निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्ष, गोरसेना, परिवर्तन संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी ७ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्का जाम आंदोलन केले.

आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागातील अधिकारी व कंत्राटदार संगनमताने शासकीय निधीचा अपव्यय करत असल्याचा आरोप केला. सुमारे ३० लक्ष रुपयांच्या विकासकामात सिमेंटचा अपुरा वापर, रेतीऐवजी डस्टचा वापर, जुने साहित्य वापरून काम करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.

कामाची चौकशी करून गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत तपासणी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. तब्बल अर्धा तासानंतर महसूल प्रशासनाने हस्तक्षेप करत संबंधित शाखा अभियंत्यास पाचारण केले. क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top