dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार कार्यालय माथेफिरुने पेटवले; सुदैवाने जीवित हानी टळली

छत्रपती संभाजीनगर :  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रभाग क्रमांक 16 मधील उमेदवार डॉ. मयुर सोनवणे यांचे प्रचार कार्यालय माथेफिरुकडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना बुधवार, 7 जानेवारी रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती डॉ. मयुर सोनवणे यांनी दिली.

डॉ. मयुर सोनवणे हे मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवार असून त्‍यांचे कैलासनगर परिसरात प्रचार कार्यालय आहे. बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरुने प्रचार कार्यालयासमोरील मंडपाला आग लावली. त्यावेळी प्रचार कार्यालयात चार ते पाच कार्यकर्ते झोपलेले होते. हा प्रकार पहाटेच्या सुमारास काही नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडा-ओरड करीत मंडपाला लागलेली आग विझवली. या घटेनत मंडप आणि मंडपात लावलेले दोन फोकसचे नुकसान झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर डॉ. मयुर सोनवणे, शिवाजी खानापूर, विजय वाकतकर आदींनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. याप्रकरणी डॉ. मयुर सोनवणे यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून माथेफिरुवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top