जालना : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या निवासी इंग्रजी शाळेची तक्रार केली म्हणून संस्थाचालकाकडून तक्रारदाराला मारहाण केल्याचा प्रकार रविवार, 13 जुलै रोजी वडीगोद्री येथे घडला.

जालना : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या निवासी इंग्रजी शाळेची तक्रार केली म्हणून संस्थाचालकाकडून तक्रारदाराला मारहाण केल्याचा प्रकार रविवार, 13 जुलै रोजी वडीगोद्री येथे घडला.
येथील संत सावता इंग्लिश स्कूलचे संस्थाचालक सचिन जाधव यांनी मारहाण केल्याची तक्रार सोमनाथ काळे यांनी गोंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धनगर सामाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारची
राजे यशवंतराव होळकर निवासी वस्तीगृह योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातून वडीगोद्री येथील संत सावता इंग्लिश स्कूल बोगस अनुदान लाटत असल्याची तक्रार सोमनाथ काळे यांनी केली होती. त्याअनुषंगाने संत सावता इंग्लिश स्कूलमध्ये पुणे येथून बहुजन कल्याण विभागाच्या पथकांकडून रविवारी तपासणी करण्यात आली. या पथकातील अधिकाऱ्यांना सोमनाथ काळे व हरिश्चंद्र गावडे हे वडीगोद्री येथील राष्ट्रीय महामार्गावर मार्केट कमिटीसमोर निवेदन देत असताना त्या ठिकाणी संस्थाचालक सचिन जाधव आले आणि तक्रारदार काळे व गावडे यांना जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करत मारहाण केली, असे काळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार चौकशी पथका समोरच घडला असल्याची तक्रार सोमनाथ काळे यांनी गोंदी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. गोंदी पोलिसांनी या प्रकरणी संस्थाचालक सचिन जाधव व संजय देवगिरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली आहे.
