dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दिगाव पूर्णा नदीवर श्रमदानातून महिलांनी बांधला वनराई बंधारा  : नरेंद्राचार्य भक्तमंडळाचा ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ कृतीतून संदेश  

नाचनवेल :  कन्नड तालुक्यातील दिगाव खेडी येथील पूर्णा नदीवर श्रमदानातून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तमंडळींनी व ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधला. वनराई बंधारा पूर्ण होताच मोठ्या प्रमाणावर पाणी अडवले गेल्याने भूजल पातळीत वाढ झाली आहे. श्रमदानातून हा वनराई बंधारा बांधण्यासाठी महिलांनी विशेष पुढाकार घेतला होता.

दिगाव खेडी येथील पूर्णा नदीवर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तमंडळींनी व ग्रामस्थांनी एकत्र येवून वनराई बंधारा बांधला आहे. वनराई बंधाऱ्यात लाखो लिटर पाणी साचले असून या पाण्यामुळे नदीकाठच्या विहिरींना आणि विंधन विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी आले आहे. नरेंद्राचार्य भक्तमंडळींनी श्रमदानातून पाणी आडवा, पाणी जिरवा हा संदेश दिला आहे. तसेच ज्या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी केटीवेअर, शिवकालीन बंधारे, कोल्हापुरी बंधारे नाहीत त्या ठिकाणी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन वनराई बंधारा बांधावा असे आवाहन सरपंच पुजाराम सुसुद्रें यांनी आणि नरेंद्राचार्य भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top