नांदुरा–खामगाव रोडवर आमसरी फाट्याजवळ भीषण अपघात; आई आणि चिमुकलीचा जागीच मृत्यू, वडील थोडक्यात बचावले

नांदुरा : नांदुरा ते खामगाव मार्गावरील आमसरी फाट्याजवळ 18 डिसेंबर रोजी दुपारी अंदाजे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण रस्ते अपघात घडला. आमसरी फाट्यासमोरून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीवर बसलेल्या शीतल दिलीप बोंबटकर व त्यांची चिमुकली मुलगी श्रावणी दिलीप बोंबटकर यांचा जागीच मृत्यू झाला.

नांदुरा : नांदुरा ते खामगाव मार्गावरील आमसरी फाट्याजवळ 18 डिसेंबर रोजी दुपारी अंदाजे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण रस्ते अपघात घडला. आमसरी फाट्यासमोरून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीवर बसलेल्या शीतल दिलीप बोंबटकर व त्यांची चिमुकली मुलगी श्रावणी दिलीप बोंबटकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती दिलीप प्रभाकर बोंबटकर हे थोडक्यात बचावले. अपघात इतका भीषण होता की आई-लेकीने घटनास्थळीच प्राण सोडले. अपघातात मृत्युमुखी पडलेले कुटुंब हे निमगावजवळील नारायणपूर येथील बोंबटकर कुटुंब असल्याची माहिती आहे. अपघातानंतर संबंधित ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून फरार ट्रकचालकाचा शोध सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »