Murder in Chinchgaon: चिंचडगावात शेतीच्या वादातून एकाचा खून, दोघां विरुद्ध गुन्हा दाखल

Murder in Chinchgaon

Murder in Chinchgaon: शेतीच्या वादातून काठीने जबर मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना तालुक्यातील चिंचडगाव येथे सोमवारी, 6 जानेवारी रोजी घडली. सुनिल कडुबा वाघ (३०) रा चिंचडगाव असे या घटनेतील मृत इसमाचे नाव आहे.

Murder in Chinchgaon
वैजापूर : शेतीच्या वादातून काठीने जबर मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना तालुक्यातील चिंचडगाव येथे सोमवारी, 6 जानेवारी रोजी घडली. सुनिल कडुबा वाघ (३०) रा चिंचडगाव असे या घटनेतील मृत इसमाचे नाव आहे. तर विजय पुंजाहरी वाघ, पोपट लहानू वाघ दोघे रा चिंचडगाव असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनिल वाघ व विजय वाघ हे भावबंद असून त्यांची शेजारी शेजारी शेती आहे.या दोघांमध्ये सामाईक बांधावरून नेहमी भांडणे होत असत. जुन्या वादातून विजय वाघ व पोपट वाघ या दोघांनी चिंचडगाव येथील समाज मंदीरासमोर काठीने जबर मारहाण करून सुनिल यांचा निर्दयीपणे खून केला. मयत सुनिल यांची पत्नी व दोन मुले हे माहेरी राहतात. तर त्यांचे आई वडील देखील मयत असल्याने ते घरी एकटेच राहत होते. या घटनेची माहिती सरपंच शरद बोरनारे यांनी सुनिल वाघ यांच्या बहिणीचे पती हिंमत भोसले व पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीसांनी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणला. उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी हिंमत नारायण भोसले रा. भामाठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय वाघ व पोपट वाघ या दोन जणांविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »